Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता, २४ जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २४ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

  • महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

  • पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

  • विदर्भातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाने दडी मारली त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस पडला नाही त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. हवामान खात्याने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पाऊसाचा धुमाकूळ सुरू आहे. अशात पुढचे काही तास या सर्व जिल्ह्यांसाठी महत्वाचे राहणार आहेत. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ४ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसंच, राज्यातील इतर २० जिल्ह्यांमध्येही पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क रहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचाऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, नांदेड, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जालना, बीड, धाराशिव येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ब्लड डोनेशन संदर्भात एफ डी ए आयुक्त यांची महत्वाची माहिती

आता सुटे मसाले विकता येणार नाहीत? तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं!

Pune : मोठी बातमी! रॅपिडो बाइक - टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश; वाचा सविस्तर

DoT Telecom Rules: मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंग कॉलबाबत नवा नियम; १ नोव्हेंबरपासून काय बदलणार, जाणून घ्या!

घर नवऱ्याच्या नावावर, तरीही त्यालाच घराबाहेर काढलं! बायकोने जिंकली केस; कोर्टाचा निर्णय नेमका काय?

SCROLL FOR NEXT