SchoolAdmission saam tv
महाराष्ट्र

शाळांमध्ये प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती, लेखी-तोंडी परीक्षा घेता येणार नाहीत; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; वाचा नवीन नियम जाहीर

Maharashtra School Admission Rules: महाराष्ट्रातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाखती, लेखी-तोंडी परीक्षा आणि स्क्रीनिंग टेस्ट घेण्यास बंदी. शिक्षण विभागाने नवीन SOP जारी केली असून पुस्तक खरेदी आणि शुल्क वसुलीबाबतही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत.

Omkar Sonawane

राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. आता प्रवेश देताना शाळांना मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मुलाखती घेता येणार नाहीत. तसेच लेखी किंवा तोंडी परीक्षा, कोणत्याही प्रकारची चाचणी अथवा स्क्रीनिंग टेस्ट करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने सोमवारी यासंदर्भातील SOP जारी केली आहे.

प्रवेश प्रक्रियेत मनमानी कारभार रोखणे, अनधिकृत शुल्क वसुलीला आळा घालणे आणि शिक्षण हक्क कायद्याची RTE प्रभावी अंमलबजावणी करणे या निर्णयामागील उद्देश आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी हे आदेश जारी केले आहेत. राज्यातील सर्व बोर्डांच्या आणि माध्यमांच्या मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित शाळांना हे नियम लागू असतील. काही शाळांकडून प्रवेशासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याच्या, मुलांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याच्या तसेच देणगी आणि अनधिकृत शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुस्तके विशिष्ट दुकानांनमधून घेण्याची सक्ती नाही;

राज्य मंडळ, CBSE आणि ICSE मंडळाच्या शाळांना NCERT आणि SCERT अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांचा वापर करावा लागेल. यामध्ये बालभारतीच्या पुस्तकांचाही समावेश असेल. इतर मंडळांच्या शाळांना संबंधित मंडळाने मान्यता दिलेल्या पुस्तकांचाच वापर करावा लागणार आहे. कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांना विशिष्ट खासगी प्रकाशकांकडूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.

प्रवेश प्रक्रियेच्या काळात गटशिक्षणाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शाळांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अचानक भेटी देऊन प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क वसुलीची पाहणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Admission Rules : नर्सरी-केजी प्रवेशासाठी मुलाखती, परीक्षा अन् डोनेशन घ्याल तर याद राखा! नियम मोडणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

Maharashtra News Live Update: पैठणमधील गोदावरी नदीकाठी मच्छीमार महिलांचं जलसमाधी आंदोलन

Water Crisis : ठाणे आणि भिवंडीत पाणीबाणी! काही भागांत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद

Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह; वडिलांच्या कॉलमुळे धक्कादायक प्रकार उघड

Motor Insurance Rules : १५ डिसेंबरपासून वाहनधारकांना मोठा झटका! कार-बाईक विम्याचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT