Maharashtra Today Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात उष्णतेची लाट आणि पावसाचा दुहेरी प्रभाव

  • अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

  • विदर्भात तापमान 44°C च्या पुढे

  • काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

  • नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी बदल पाहायला मिळत असून, एकीकडे उन्हाचा तीव्र चटका तर दुसरीकडे पूर्वमोसमी पावसाच्या सरी अशा दोन्ही परिस्थितींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. आज तुरळक ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका कायम राहणार आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारपट्टी भागात उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्याने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.

दरम्यान, मागील २४ तासांत राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला आणि वर्धा येथेही ४४ अंशांच्या आसपास तापमान राहिले. नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. याउलट, महाबळेश्वर येथे १६.३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले.

गेल्या काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह हलका ते मध्यम पाऊस झाला असून, काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला आहे. विशेषतः रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळल्या, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT