Maharashtra CM Devendra Fadnavis and leader Sunetra Pawar during a key cabinet discussion amid Finance Ministry reshuffle buzz. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: तिजोरीच्या चाव्या सुनेत्रा पवारांकडे जाणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

Sunetra Pawar Will be Finance Minister: अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखातं कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिलेत.

Bharat Jadhav

  • अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे महत्त्वाची खाती

  • अर्थ खाते सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीसांकडेच

  • तिजोरीच्या चाव्या सुनेत्रा पवारांकडे देण्याचे संकेत

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला.दादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासह दादांकडील उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही खाती देण्यात आली. मात्र ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावर अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवलं. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या तिजोरीच्या चाव्या सुनेत्रा पवारांकडे देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. तर मंत्री छगन भुजबळांनीही त्याला दुजोरा दिलाय.

खरंतर सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमापासून अजितदादा दोन पाऊलं मागे होते.. मात्र विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला आणि माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा विक्रम मोडता मोडता राहिला. मात्र दादांच्या मृत्यूनंतर अर्थसंकल्पासाठी घ्याव्या लागणाऱ्या बैठकांमुळे फडणवीसांनी अर्थमंत्रिपद स्वतःकडेच ठेवलं.

महायुतीची सत्ता स्थापन करताना अर्थ खातं दादांच्या राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं.. आता सध्यातरी अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलं तरी आगामी तीन ते चार महिन्यात अर्थ खातं सुनेत्रा पवारांकडे दिलं जाणार आहे.त्यामुळे दादांचं कुटुंब सांभाळणाऱ्या आणि बारामती टेक्स्टाईलचा गाडा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यानंतर त्या दादांप्रमाणेच काटेकोरपणे अर्थ खातं सांभाळणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT