Succession debate heats up in Baramati following Ajit Pawar’s demise. saam tv
महाराष्ट्र

Baramati Politics: 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार? रोहित पवारांच्या विधानावर जय पवारांचं स्पष्ट शब्दात उत्तर

Who is Ajit Pawar Succeed: बारामती पोटनिवडणुकीदरम्यान अजित पवार यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्यावरून चर्चा रंगू लागली आहे. वाढत्या अटकळांच्या पार्श्वभूमीवर जय पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Bharat Jadhav

  • बारामती पोटनिवडणुकीत राजकारण तापलं

  • पवारविरुद्ध पवार लढत होणार?

  • अजितदादांचा वारसदार कोण?

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. मात्र मतदानादरम्यान नव्या राजकीय युगाच्या चर्चेला सुरुवात झाली. ही चर्चा होती,अजितदादांचा वारसदार कोण किंवा त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? २०२९मध्ये आपण अजितदादांचा वारसदार असू विधान केलं जय पवार यांनी केलं होतं. त्यावरून ही चर्चा सुरू झाली होती. यानंतर पुढे भविष्यात पवार विरुद्ध पवार लढत होईल अशी शक्यता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वर्तवली होती.

राजकीय वर्तुळातून प्रतिक्रया येऊ आल्यानंतर जय पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत परत आपल्या विधानाबाबतचा खुलासा केला. अजितदादांचा वारसदार व्हावा असं आपल्याला वाटत नाही तर जनतेला वाटत आहे, असा खुलासा जय पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत केला. २०२९मध्ये पवार विरुद्ध पवार राजकीय युद्ध होऊ शकतं, असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत.

पवार विरुद्ध पवार असा युद्ध होऊ नये, अशी सर्वांची इच्छा आहे. रोहित पवारांच्या पवार विरुद्ध पवारच्या लढत होणार विधानावरून जय पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रोहितदादा काहीतरी बोलले त्यावरून युगेंद्रदादा यांनी प्रतिक्रिया दिली. परंतु आम्ही कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. पवार कुटुंबाची इच्छा आहे की, आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं. विलिनीकरणावर पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. २०२९ मध्ये पवारविरुद्ध पवार हा सामना होणार नाही, असं जय पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं.

२०२९ मध्ये अजितदादांचा वारसदार होणार?

सकाळी मी काही विधान केलं, त्याचा अर्थ अनेकांनी चुकीचा घेतला. २०२९ मध्ये मला उमेदवारी द्यावी अशी मागणी लोकांची आहे. मी आधीपासून बोलत आलो आहे की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मला पक्षासाठी काम करायचा आहे, तेही कार्यकर्ता म्हणून. जर लोकांची इच्छा असेल की २०२९ ला मला उमेदवारी द्यावी. पण माझी इच्छा आहे की, सर्वांसोबत काम करावं. आधी नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळीही माझ्या नावाची चर्चा होती. त्यावेळीही दादांना सांगितलं होतं की, मला लहान कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, असं जय पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT