महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय.. याच मुद्द्यावरून राहुल गांधी विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात आर्टिकल वॉर रंगल आणि त्यानंतर आता रंगतय ट्विटर वॉर. राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-प श्चिम नागपूर या मतदारसंघातच घोळ झाल्याचा गंभीर आरोप केलाय.
फडणवीसांच्या मतदार संघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले
काही बुथवर 20 ते 50 टक्के मतदारांची वाढ
बीएलओंकडून अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद
निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी?
ही एक प्रकारे मत चोरी
त्यामुळे काँग्रेसकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी
राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीस यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केलीय. तर राहुल गांधींच्या ट्वीटनंतर आता फडणवीसांनीही ट्विट करुन काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव असल्याचा पलटवार केलाय.
झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो
महाराष्ट्रातील पराभव मान्य आहे की दारुण पराभवाची वेदना वाढतेय
असे किती दिवस हवेत बाण सोडणार?
ट्वीट करण्याआधी गांधींनी अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊतांशी बोलायला हवं होतं
किमान काँग्रेसमधल्या संवादाचा अभाव इतका स्पष्ट समोर आला नसता
खरंतर नागपूर दक्षिण पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून फडणवीसांनी सलग 4 वेळा विजय मिळवलाय. यामध्ये फडणवीसांच्या लीडमध्ये घसरण होत असल्याचं चित्र आहे. मात्र आता राहुल गांधींनी वाढलेल्या मतदानावरच बोट ठेवल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.