Maharashtra Politics  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटानंतर बविआला मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : वसई विरारमध्ये ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता बहुजन विकास आघाडीतील मोठ्या नेत्याने भाजपची वाट धरली आहे. यामुळे वसई विरारमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

Ganesh Kavade

  • वसई विरारमध्ये राजकीय उलथापलथ

  • ठाकरे गटानंतर बविआला खिंडार

  • माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

गणेश कवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे नेते नितीन ठाकूर यांनी दोन माजी नगरसेविकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता आणखी एका नेत्याने बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये पक्षांतर केले आहे. वसई-विरारमध्ये ठाकरे गटानंतर भाजपने बविआला धक्के दिले आहेत.

वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्षाने बहुजन विकास आघाडीला धक्का दिला आहे. वसई विरारचे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. बविआच्या शेकडो कार्यकर्त्यांसह महेश पाटील यांनी भाजपची वाट धरली. याआधी बविआमधील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये महेश पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. 'वसई विरारचे प्रश्न सोडवायचे असतील, तर ट्रिपल इंजिनच सरकार आणण्याची गरज आहे. महापालिकेत सत्ता आल्यास आम्ही पारदर्शक कारभार करु', असे वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. महेश पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

५ ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी तब्बल १६ विभाग प्रमुखांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. देशमुख हे आधी बहुजन विकास आघाडीमध्ये होते. कालांतराने त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपमध्ये बहुजन विकास आघाडीतील नेत्यांची एन्ट्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूरस्थिती हिंगणी हवेलीत नऊ नागरिक पाण्यात अडकले

savalyachi janu savali: मेहेंदळे कुटुंबाच्या व्यवसायातून तिलोत्तमा या व्यक्तीला करणार बेदखल? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

Hero चा धमका! लाँच केली Activaहून स्वस्त स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही

EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT