Prakash Ambedkar Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकर यांचे मोठं संकेत

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार.', असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सध्या राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार.', असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकरांचे यांनी विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच मोठे संकेत दिले आहे. 'राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार.', असल्याचे त्यांनी सांगितले. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केले. 'राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

'राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं.', या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

'बटेंगे तो कटेंगे'च्या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला आहे. 'विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्न करतंय.', असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सत्तेसोबत जाण्याच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT