ठाकरे गटातील सहा नगरसेवक पक्ष सोडू शकतात, असा भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचा दावा.
हे नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात गेले होते.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष कोणाचा याची सुनावणी सुरूय. ठाकरे गटानंतर शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला जातोय. त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंची धडधड वाढवणारी बातमी हाती आलीय. ठाकरे गटातील सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा भाजपचे गटनेते व सभागृह नेते गणेश खणकरांनी केलाय.
काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. ठाकरे गटातील ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का बसणार आहे. ऑपरेशन टायगर असून सुरूच असून ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना नेत्यांकडून केला जातोय. त्याचदरम्यान भाजपचे गटनेते गणेश खणकरांनी भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याचा दावा केलाय. येत्या काही दिवसात ही संख्या वाढणार असून ती ९४ ते ९५ वर जाईल, असा दावा गणेश खणकर यांनी केलाय.
माध्यमांशी बोलताना खणकर म्हणाले की, समोरील उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांचा आकडा वाढणारच, असे आमचेही आकडे वाढणार आहेत. जवळपास आमचे तीन ते चार नगरसेवकांचे अर्ज असेच लाईनमध्ये आहेत आणि त्यांच्या समोरच्या उमेदवारांची अशीच दाट पडताळीमध्ये अपात्रता घोषित होईल अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आमचाही साधारणत आकडा वाढेल आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की साधारणतः या पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये आम्ही 94 ते 95 या आकडा पार करू.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. लवकरच महापालिका सभागृहात याबाबत जाहीर करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचं नगरविकास विभागाला पत्राद्वारे माहिती देण्यात आली. विशाखा राऊत या पुढील सहा वर्षे नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत.
प्रभाग क्रमांक १९१ हा मागास प्रवर्ग (महिला) राखीव असल्याने या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र, त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढलेल्या प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरच आक्षेप घेतला होता. प्रिया सरवणकर यांनी याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राच्या दाव्याची पडताळणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.