Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: 'सरत्या वर्षासह अपात्र सरकारलाही निरोप देऊ..' सुप्रीम सुनावणीनंतर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घणाघाती टीका केली.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी

Uddhav Thackeray News:

शिवसेनेच्या आमदार अपात्रेच्या सुनावणीवरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले आहेत. कालच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी करावी असे आदेश दिले आहेत. या सुनावणीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करत शिंदे गटावर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्यात सध्या दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला मराठा आरक्षणाचा लढा आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही आपली आहे, मात्र तीच लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत सरत्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकारलाही निरोप दिला जाईल.. असे ठाकरे यावेळी म्हणाले.

"सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश दिले आहेत. मात्र नार्वेकर मी आदेश वाचला नसल्याचे म्हणत आहेत. म्हणून मी न्यायालयाचा आदेश वाचत असून माझ्या आमदारांनीही नार्वेकरांना आदेशाची कॉपी द्या, त्यांच्यासमोरही वाचन करा.." असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही घणाघाती टीका केली. "मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर दिसत नाही. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यु झाला आहे तर राज्य जळत असताना दुसरे उपमुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत आहेत, मराठा आंदोलनापेक्षा त्यांना पक्षाचा प्रचार महत्वाचा वाटतो.." अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन

Maharashtra Live News Update : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या 40 फूट उंच होर्डिंग चे लोकार्पण

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT