Uddhav thackeray criticizes eknath shinde over chhaava Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : जे पळून गेले, त्यांनाही छावा दाखवा.. उद्धव ठाकरेंचा नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला

Maharashtra Politics : महायुतीद्वारे सर्व आमदारांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट दाखवण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

Yash Shirke

Uddhav Thackeray : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता. तो उत्तम प्रशासक होता. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल, महाराष्ट्रातील दैवतांबद्दल कोणी अपशब्द काढेल त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा असं बोलण्याची कुणाची हिंमत होता कामा नये. अबू आझमी यांचे कायमचे निलंबन केले पाहिजे असे माझे मत आहे' असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

विधानसभा सदस्यांसाठी, आमदारांचा विकी कौशलचा 'छावा' चित्रपट दाखवण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले, 'ज्यांची ही कल्पना आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. महायुतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा 'छावा' दाखवला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही चित्रपट दाखवायला हवा.'

'छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर कृतीतूनही दाखवले. त्या छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट गद्दारांना दाखवलाच पाहिजे. जे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीतीने जे पळून गेले, त्या गद्दारांनी छावा चित्रपट पाहिलाच पाहिजे. महाराजांची गद्दारांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

Maharashtra News Live Update: मूलभूत सुविधांसाठी बुलढाण्यात आदिवासींचा एल्गार

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT