Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: माझी चूक झाली, पुन्हा नाही होणार...; उल्हासनगरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी शेवटी ती गोष्ट सांगितलीच!

Maharashtra Politics: यापुढे निष्ठावंतानाच तिकीट दिली जातील, या आधी माझी चूक झाली आता अशी चूक कधीच होणार नसल्याचं म्हणत उल्हासनगर येथील सभेत शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

कल्याण कोणाच्या बापाचं नाही, त्यामुळे कल्याणमध्ये नुसतं गडायच नाही पाताळात गडायच, गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. पुन्हा शिवरायांच्या जन्मभूमीत असे गद्दार जन्माला आले नाही पाहिजेत. यापुढे निष्ठावंतानाच तिकीट दिली जातील, या आधी माझी चूक झाली आता अशी चूक कधीच होणार नसल्याचं म्हणत उल्हासनगर येथील सभेत शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

माझी शस्त्र किती लकलखती आहेत त्यापुढे गद्दारांचे बुरुज टिकणार नाहीत. गद्दार आता दिल्लीत लादी पुसतात, भांडीकुंडी साफ करतात. काल मोदींनीही साफसफाई केलेय ही चांगली गोष्ट आहे. आम्ही जाहीर केल्यानंतर मोदी काळाराम मंदिरात गेले. तसंच आता मी जाहीर करत आहे की मी शिवनेरीला जाणार आहे. आता मोदींनी माझ्या आधी तिथे पोहोचून थोडी साफसफई करावी, असा टोला त्यांनी काळाराम मंदिरात मोदी यांनी केलेल्या साफसफाईनंतर लगावला आहे.

कोकणी पट्ट्यात शिवसैनिक एकवटलेत-राऊत

हा सगळा कोकणीपट्टा असून शिवसैनिक सिंधुदुर्गपर्यंत एकवटलेले आहेत. या शाखेचे उद्घाटन बाळासाहेबांनी केलंय यामुळे हा सैनिक निष्ठावंत आहे. इथे खोके चालणार नाहीत एकनाथ शिंदेंच्या घरणेशाहीला गाडण्याची सुरुवात इथूनच होणार आहे. शिवसेनेचा हा भगवा गफदारांच्या हातात सोपावणाला जाणार नााही, असा पण खासदार संजय राऊत यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंचा धक्कादायक निर्णय; सोडली तीन खात्यांची धुरा|VIDEO

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Arbaaz Khan : मोजके सिनेमे करूनही अरबाज खान मालामाल; मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट, सलमानच्या भावाचा स्वॅगच भारी

Eye Dark Circle Removal Tips: डोळ्याखालची काळी वर्तुळे कशी घालवायची?

Samruddhi Expressway : ‘समृद्धी’वर पोहोचण्यासाठी लागणार १०० रुपये, आमणे-ठाणे प्रस्तावित मार्गावर टोलचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT