Supriya Sule News Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule: 'लढेंगे जरुर! ८० वर्षाच्या वडिलांना कोर्टात जाऊ देणार नाही...' राष्ट्रवादी संघर्षावर सुप्रिया सुळेंचे विधान

Supriya Sule On NCP Crisis: जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची, निकालाची भीती वाटत नाही...असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मंगेश कचरे

Maharashtra Political News:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या त्यांच्या मतदार संघाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावात गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरुन मोठे विधान केले असून "हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरूर" असे म्हणत ८० वर्षाच्या वडिलांना कोर्टात एकटे जावु देणार नाही.. असा निर्धार व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्याचा दौरा केला. यावेळी बोलताना त्यांनी न्यायालयीन लढाईमुळे मतदार संघासाठी वेळ मिळत नसल्याची कबुली दिली. "मतदार संघातील कामाचा अर्धा वेळ हा केसा लढण्यात जात आहे. नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता 11 महिने टाटा बाय-बाय, मला फक्त टीव्हीवरच बघा.." असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

तसेच पुढे बोलताना "एकटा माणूस काय करणार? सर्व जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे आता ऑक्टोबरपर्यंत वेळ नाही. मतदार संघ बघायचा? कामे बघायची, की कोर्टाच्या केसेस? पवार साहेब स्वतः जातात मात्र जनाची नाही मनाची तरी आहे. 80 वर्षाच्या वडिलांना एकटे कोर्टात जाऊ देणार नाही.. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लढेंगे जरुर...

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी "कोर्टाची पायरी चढलोय आता उतरायचे नाही. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची, निकालाची भीती वाटत नाही. कारण आपण खरे आहोत. असे म्हणत आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली आहे. हारेंगे या जितेंगे ये बाद मे देखेंगे मगर लढेंगे जरूर," असे म्हणत आरपारच्या लढाईचा निर्धारही व्यक्त केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT