Sunetra Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न, सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन

Baramati By-Poll: बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन करून उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली.

Priya More

Summary -

  • बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू

  • सुनेत्रा पवारांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला केला फोन

  • हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची केली विनंती

  • काँग्रेसकडून उमेदवार दिल्यामुळे राजकीय वातावरण तापले

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आहेत. राज्यामध्ये एखाद्या नेत्याचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेसने याठिकाणी उमेदवार दिल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशात अजूनही सुनेत्रा पवारांकडून काँग्रेसला निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीने सर्व राजकीय पक्षांना बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. पण असे असताना देखील काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार दिला. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चिन्ह आहेत. काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. अशात आता सुनेत्रा पवार यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बारामती पोटनिवडणुकीमध्ये ६ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्यात आले. बारामती पोटनिवणुकीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यविरोधात काँग्रेस उमेदवाराची थेट लढत होणार आहे. तर या ठिकाणी करुणा धनंजय मुंडे या देखील निवडणूक लढवणार आहेत. आता बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करत काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केल्याची माहिती सांगितली जात आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ९ एप्रिल ही शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक पोटनिवडणूक करण्यासाठी विनंती केली. आता काँग्रेस नेमका काय निर्णय घेतेय आणि पक्षाची नेमकी भूमिका काय असणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुखांची पत्नी मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक लढवणार

Crime: अकोला हादरले! आधी गळा दाबून बायकोची हत्या, नंतर तरुणाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Pune : वॉटरपार्कमध्ये जाताय तर सावधान! शिरुरमध्ये महिलेच्या मणक्याचे चार तुकडे

डेव्हिड मिलरला अश्रू अनावर! दिल्लीला शेवटच्या २ चेंडूंत २ धावा हव्या होत्या; पण गुजरातने जबड्यातून विजय हिसकावला, व्हिडिओ व्हायरल

Thursday Horoscope: जवळच्या व्यक्तीपासून राहा सावध, ५ राशींना होणार धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT