Sujay Vikhe Patil Criticized Jayashree Thorat:  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नगरचं राजकारण तापलं! काल जयश्री थोरातांनी झापले, आज सुजय विखेंनी पुन्हा डिवचले!

Priya More

सचिन बनसोडे, शिर्डी

माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातील तळेगाव येथे सभा घेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांना प्रतिउत्तर दिले होते. 'खबरदार जर माझ्या बापाबद्दल बोलले तर', अशा शब्दात जयश्री यांनी सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला होता. जयश्री थोरात यांच्या या वक्तव्यानंतर सुजय विखे यांनी पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील साकुर गावात भव्य सभा घेत जयश्री थोरात यांच्यावर निशाणा साधला.

'ताई.. ओ ताई.. मी तुमच्या वडिलांबद्दल बोललो नाही तर इथल्या निष्क्रिय आमदाराबद्दल बोललो. राहात्यात येऊन तुम्ही माझ्या वडिलांविषयी घाण घाण बोलला, पण मी काहीही उत्तर दिले नाही. पण मी फक्त ट्रेलर दाखवला तर लगेच तुम्हाला तुमचा बाप आठवला. ताई..ओ ताई.. हे असं वागणं बरं नाही.', अशा शब्दात सुजय विखे यांनी जयश्री थोरात यांना खडे बोल सुनावलेत. यासह रामदास आठवले यांच्याकडून शेरो शायरी शिकल्याचे सांगत सुजय विखे यांनी पुन्हा एकदा 'टायगर अभी जिंदा है ' या डायलॉगने भाषणाची सांगता केली.

सुजय विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, 'ताई मी तुमच्या वडिलांबद्दल बोललो नाही. मी आमदाराबद्दल बोललो. त्यांच्या निष्क्रियतेबद्दल बोललो. संविधानाने दिलेला हक्क मी बजावला. एखादा माणूस शोषण करत असेल तर मी बोलणार. ताई..ओ ताई.. जरा ऐकायला शिका. वर्षानुवर्ष तुम्ही तोंड बंद केलीत. मात्र हा आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघात परिवर्तन केल्याशिवाय हा आवाज थांबणार नाही हे लक्षात ठेवा.

तसंच, 'आज मी प्रथमच ऐकलं इथला नेता सात लाख लोकांचा बाप आहे. ५० वर्षे विखे परिवाराने राजकारण केलं. आम्हाला संस्कार आहेत की, जनता मायबाप आहे. मात्र संगमनेर तालुक्यात नेते बाप आहेत हे आज कळालं. आज तुम्ही गोरगरीब जनतेचा बाप काढायला निघाल्या हे सहन होणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत या तालुक्याचा बाप कोण ही संगमनेरची गोरगरीब जनता दाखवून देईल. जनताच मायबाप हे दाखवायचं असेल तर परिवर्तन करा. एकदा फक्त महायुतीच्या पाठीशी उभे रहा, सुजय विखे तुमच्या घरात येऊन तुमच्या अडचणी सोडवेल हा माझा शब्द आहे.', असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

त्यासोबतच 'आमच्यावर खडी क्रेशर बंद केल्याचा आरोप करता. एक सहकारी साखर कारखाना या पठारा भागात कधी यांनी उभा केला नाही. हे महसूल मंत्री असताना यांनी विकास होऊ दिला नाही याचे माझ्याकडे पुरावे आहेत. जसे तुम्ही द्याल तसंच तुम्हाला मिळेल.आता तुमची वेळ संपलेली आहे. ४० वर्षे आमदार आणि पंधरा-वीस वर्षे मंत्री असून या भागाला पाणी देऊ शकला नाही. संगमनेर तालुक्यातील पुढाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनी बाळकावून बिगर आदिवासी केल्या याचे पुरावे निश्चितच मी देणार.', असे सुजय विखेंनी सांगितले. तसचं, 'मी डॉक्टर आहे त्यामुळे कधी कोणते इंजेक्शन द्यायचं हे मला कळतं. ताई तुम्हीही डॉक्टर मी पण डॉक्टर. पण मी मेंदूचा डॉक्टर आहे. त्यांनी जरी जनतेचा बाप काढला असेल तर मी त्यांच्या वतीने लाडकी बहीण समजून माफी मागतो.', असे सुजय विखेंनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: पेला ढोकळा खाल्ला का? असा बनवा ग्लास खमंग ढोकळा, पाहा खास रेसिपी

Diwali Special Saree : खास दिवाळीसाठी अशी साडी ट्राय करा; तुम्हीच सगळ्यात सुंदर दिसाल

Maharashtra News Live Updates: दिवाळीत धावणार पुणे ते नागपूर शिवनेरी बस

दिवाळीच्या दिवसात भेसळयुक्त पनीर कसं ओळखाल?

Akola News : भाजपच्या गडात उच्चशिक्षित तरुण उतरणार निवडणुकीच्या मैदानात?; वंचितकडे मागितली उमेदवारी

SCROLL FOR NEXT