Maharashtra Politics Sudhir Mungantiwar On Chandrapur Loksabha Election Said Not willing Contest Election  Saam tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: माझं तिकीट कापलं जावं यासाठी प्रयत्न करतोय.. सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य; कारण काय?

Maharashtra Politics News: महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरुन शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे तिकीटासाठी चढाओढ सुरू आहे.

Gangappa Pujari

Loksabha Election 2024:

महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरुन शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे तिकीटासाठी चढाओढ सुरू आहे. अशातच सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र माझं तिकीट कापलं जावं, अशी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Loksabha Election)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाकडून चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाकडून चंद्रपुरच्या जागेसाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव सुचवल्याचे बोलले जात आहे. अशातच सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र माझं तिकीट कापलं जावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

"आम्ही राज्यात सध्या २५ जागांवर आहोत. त्याची सद्यस्थिती, सत्यस्थिती याचं सादरीकरण झालं. सध्या आम्ही २५ जागांवर आहोत, त्यामध्ये पक्षाने जेवढ्या जागांवर वाढ करतील तेवढ्या जागा लढवू, चंद्रपूरसाठी पक्षाने माझं नाव सुचवलं आहे. मात्र माझं तिकीट कापलं जावं, यासाठी मी आग्रही आहे," असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणालेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, राज्यात सध्या लोकसभेच्या जागांवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता महायुतीतील मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान दिल जाणार असल्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या उमेदवारीत स्थान मिळणं कठीण आहे, सध्याचे राहू द्या, विधानसभेत बघू, असे मित्रपक्षांना आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT