उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
बारामती विमानतळाजवळ झाला अपघात
अजित पवारांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का
नाशिकमधील समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पदाधिकारी सुदाम बोडके यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त ऐकून सुदान बोडके यांना मोठा धक्का बसला होता. ते खूपच अस्वस्त झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातून ही दुःखद घटना समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तीव्र धक्का बसल्याने त्यांच्या एका कट्टर समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातील ही घटना आहे. ढकांबे गावचे रहिवासी ६३ वर्षीय सुदाम बोडके यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुदाम बोडके हे आपल्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना त्यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाली. ही बातमी समजताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते अत्यंत अस्वस्थ झाले. प्रकृती खालावत असल्याने सुदाम बोडके यांनी तातडीने नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते स्वतःच्या गाडीने रुग्णालयाकडे निघाले. मात्र हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुदाम बोडके हे अजित दादांचे कट्टर कार्यकर्ते आणि चाहते म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुदाम बोडके यांनीच सुरू केली होती. सुदाम बोडके यांच्या अचानक निधनामुळे ढकांबे गावासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.