uddhav thackeray vs eknath shinde and 15 mla list supreme court will pronounce verdict on disqualification maharashtra political crisis  Saam TV
महाराष्ट्र

16 MLA Disqualification: पक्षचिन्ह; आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाला दिलासा नाहीच! तात्काळ सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

Maharashtra Politics: 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

16 MLA Disqualification Case: शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोर्टानं आज दिलासा देण्यास नकार दिला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १६ आमदार अपात्रतेबाबत आणि शिवसेना (Shivsena) पक्ष चिन्हाबाबत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषयावर निर्णय घेण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी विनंती केली होती.

परंतु आजच्या सुनावणीत कोर्टाने ठाकरे गटाला दिलासा न दिल्याचे दिसत आहे. आजच्या कामकाजात 16 आमदार अपात्र आणि पक्ष आणि चिन्हबाबतच्या याचिकेवर कोणतीही सुनावणी झाली नाही. तसेच कोर्टाकडून तात्काळ सुनावणी घेण्यासही नकार देण्यात आला असून स्पष्ट तारीखही न दिल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

त्यामुळेच आता यासंदर्भातील पुढील सुनावणी कधी होणार.. याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अपात्रतेसाठी शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा यामुळे लांबणीवर गेला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

SCROLL FOR NEXT