Maharashtra Politics Shivsena Mla Bhaskar Jadhav Get emotional After Vikrant Jadhav Speech  Saamtv
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav News: बापच तो! लेकाचे धडाकेबाज भाषण, भास्कर जाधव यांच्या डोळ्यात अश्रू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: आज भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्याआधी चिरंजीव विक्रांत जाधव यांनी केलेले भाषण ऐकून भास्कर जाधव मंचावरच रडल्याचे पाहायला मिळाले.

अमोल कलये

Vikrant Jadhav Speech:

उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार कोकणातले दिग्गज नेते भास्कर जाधव पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत झालेल्या राड्यानंतर भास्कर जाधव यांनी पक्षाने दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली होती.

तसेच भास्कर जाधव यांनी भावनिक पत्र लिहित कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आज भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्याआधी चिरंजीव विक्रांत जाधव यांनी केलेले भाषण ऐकून भास्कर जाधव मंचावरच रडल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले विक्रांत जाधव?

"साहेब अनेक वर्ष राजकारणात आहेत. त्यांच्याकडे काहीही नव्हतं तेव्हापासून त्यांनी राजकारण केलं. साहेब मागे सरणारे नाहीत. अनेक संकटे आली. ४० वर्ष अनेक संकटे आली, संघर्ष केला. यावेळी साहेब साहेब कार्यकर्त्यांसोबत उभे राहिले. त्यावेळी आमदार नव्हते. जिल्हापरिषदेवर नव्हते. त्यावेळीही ते सहकार्यांच्या पाठीशी उभे राहिले."

परंतु, "सध्या त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. कोणीही आपल्याकडे येतो. सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण गप्प का बसतो? आता आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे? काहीही झाले तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. ते सांगण्यासाठी तुम्हाला बोलावले आहे," असे विक्रांत जाधव यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, विक्रांत जाधव यांचे हे भाषण सुरू असताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मंचावर मुलाचे आपल्या समर्थनार्थ केलेले धडाकेबाज भाषण ऐकून मंचावरचं ढसा ढसा रडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT