महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असल्यामुळे रखडल्या आहेत. निवडणुका सरकारमुळे नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये रखडल्या आहेत. निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात अशीच महायुतीची भूमिका आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आज पुण्यातील वारजे भागात मल्टीस्पेशालिटी हीलींग हॉस्पिटलचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे आणि अजित पवार या कार्यक्रमात एकाच मंचावर असल्याने कोण काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.
तितक्यात सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणातून अजित पवारांना निवडणुकीवरून प्रश्न विचारला. त्यानंतर त्याच मंचावर अजित पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका थांबल्या आहेत. या निवडणुका सरकारमुळे नाही तर सुप्रीम कोर्टामुळे थांबल्या आहेत. आम्ही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. आमच्यासारखी अन्य कार्यकर्त्यांना देखील संधी मिळवी अशी आमची इच्छा आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात अजून निर्णय झालेला नाही, असं अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं?
गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे परिसराती प्रश्न घेऊन कुणाकडे जावं असा प्रश्न आपल्या मायबाप जनतेला पडत आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे स्वप्न आदरणीय दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले होते. त्यासाठी एका नगरसेवकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी एक विनंती आहे, सरकारने निवडणुका लककरात लवकर घ्याव्यात, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना प्रश्न विचारला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.