Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं साथ सोडली, शिंदेंच्या सेनेत प्रवेश

Maharashtra Political News : आगामी निवडणूकांच्या आधी उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. कोकणातील बड्या नेत्याने ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Yash Shirke
  • ठाकरे गटाला कोकणात धक्का बसला आहे.

  • शिवसेना ठाकरे गटातील नेत्याने शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • यामुळे उद्धव ठाकरेंसह भास्कर जाधव यांना हादरा बसला आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणूकांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांमध्ये निवडणूकांच्या आधीच युती होणार असल्याचे म्हटले जात आहे. एकाबाजूला ठाकरे गटाची मोर्चाबांधणी सुरु असताना ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. रत्नागिरीच्या गुहागरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नेत्रा ठाकूर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांनाही हा मोठा हादरा असल्याचे म्हटले जात आहे.

नेत्रा ठाकूर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात, उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विपुल कदम यांच्या पुढाकाराने नेत्रा ठाकूर या शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

रामदास कदम यांनी नेत्रा ठाकूर यांच्या पक्षप्रवेशावरुन भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. गुहागरमध्ये नेत्रा ठाकूर यांनी ठाकरे गटातून पक्षांतर करुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने भास्कर जाधव यांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे. एकेबाजूला पक्षात निवडणूकांसाठी मोर्चेबांधणी सुरु असताना, दुसऱ्या बाजूला पक्षाला गळती होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

JioPC भारतात लाँच, आता कोणताही टीव्ही बनणार तुमचा कम्प्यूटर, कमी किमतीत भन्नाट सुविधा

Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

SCROLL FOR NEXT