Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Maharashtra Political News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानंतर शिवसेना शिंदे गटाला धक्के बसले आहेत. ३ माजी नगरसेवकांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Saam Tv

  • नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ३ माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये दाखल.

  • राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसलाही मोठा धक्का, महिला जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

  • फक्त ३ दिवसांत भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगमुळे नंदुरबारमध्ये पक्षाची ताकद लक्षणीय वाढली.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. लवकरच आगामी निवडणुकीबाबत घोषणा होईल असे संकेत पाहायला मिळत आहेत. अशातच नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठी इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या आधी शिवसेना शिंदे गटाला नंदुरबारमध्ये धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या राजकारणाला वैतागून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद बोडके, माजी नगरसेवक जयसिंग राजपूत आणि युवा नेते संदीप चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबारमध्ये भाजपने शिंदे गटासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही धक्के दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपची वाट धरली आहे. फक्त ३ दिवसांमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस अशा ३ पक्षांना भाजपमुळे धक्के बसले आहेत.

काँग्रेसच्या नंदुरबार जिल्ह्यातील नेत्या डॉ.समिधा नटावदकर यांनी देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. फक्त नेते, पदाधिकारीच नाही, तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील भाजपमध्ये येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नंदुरबारमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT