Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'माझ्या मुलीची बदनामी थांबवा...', दिशा सालियान प्रकरणासंदर्भात काय म्हणाले सुनील प्रभू? जाणून घ्या

Maharashtra Politics: दिशा सालियान मृत्यप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयचीची नेमणूक केली आहे. या प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक एसआयटी नेमलेली आहे. दिशा सालियानचा मृ्त्यू आत्महत्येतूनच झाला आहे. दिशा सालियानच्या आईने देखील माझ्या मुलीची मृत्यूनंतर अवहेलना करू नका, असं आवाहन देखील केलं असताना दिशाच्या मृत्यूचा फायदा घेऊन, राजकीय पोळी भाजण्याचं काम आणि शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून, तसचं आदित्य ठाकरे येणाऱ्या राजकीय प्रवाहामधलं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याच काम केलं जात असल्याचा आरोप, ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी केला आहे.

दिशा सालियान मृत्यप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयचीची नेमणूक केली आहे. या प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.

केसरकरांच्या अंतर्मनालाही पटत नसेल

सुनिल प्रभू यांनी यावेळी आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान केसरकर यांनी दिलेल्या उत्तरावरही भाष्य केलं. केसरकर यांनी साक्षमध्ये काय म्हटलं हे मी स्पष्ट ऐकलेलं नाही. पण ज्याने पक्षात येऊन काही दिवस मोजता येईल एवढाच कार्यकाळ केलेला आहे. त्यांनी शिवसेना प्रमुखांवर त्यांनी खोटं बोलावं हे त्यांच्या अंतर्मनालाही पटत नसेल, पण मजबूरी आहे म्हणून ते असं बोलत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महापालिकांची चौकशी करा

आम्ही कुठे म्हणालो की चौकशी करू नका. उदय सामंत त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही पिंपरी चिंचवडची करा, तुम्ही नाशिकची करा, तुम्ही ठाण्याची करा, तुम्ही नवी मुंबईची करा, तुम्ही नागपूरची करा, तुम्ही सर्व महापालकांची चौकशी करा. लाईनीत सर्वांची चौकशी करा. आणि मुंबई महापालिकेत मागील दीड वर्ष प्रशासक नेमून जे भ्रष्टाचार करत आहे ना त्याची देखील चौकशी करा, सगळं बाहेर येऊ दे.

दोन मंत्र्यांचा मागासवर्ग आयोगावर दबाव

राजकीय दबावापोटी दोन मंत्री सतत मागासवर्ग आयोगावर दबाव टाकत आहेत. त्यांना स्वायत्तता आहे मात्र कामात राजकीय हस्तक्षेप होतोय म्हणून अध्यक्षांनी राजीनामा दिला. हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केला आहे. त्या दोन मंत्र्यांची नावं उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

भाजपकडे वॉशिंग मशीन आहे

मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातील याचिका मागे घेण्यात आली आहे. भाजपकडे वॉशिंग मशीन आहे त्यामुळे काहीही होऊ शकत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री भाजपमध्ये गेले की त्यांचे सर्व आरोप मान्य होतात, असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्ण देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

SCROLL FOR NEXT