Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena: ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी ₹५००० कोटी खर्च; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra Political News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. शिवसेना पक्ष फोडण्यासाठी ५००० कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.

Priya More
  • संजय राऊत यांचा भाजपवर खळबळजनक आरोप

  • उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च केल्याचा दावा

  • शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला ५५० कोटी दिल्याचा आरोप

  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद सुप्रीम कोर्टात

  • संजय राऊत यांच्या आरोपाने राजकारणात खळबळ

संजय सूर्यवंशी, नांदेड

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचा? याचा वाद सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या प्रकरणावरून ठाकरेसेनेच्या नेत्यांकडून शिंदेसेना आणि भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. पक्ष आणि चिन्ह आमचे असून शिंदेंनी चोरल्याचा आरोप त्यांच्याकडून वारंवार केला जात आहे. अशातच ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. 'उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च केले. पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्यासाठी निवडणूक आयोगाला ५५० कोटी रुपये दिले.', असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.

नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 'तुमसे ना हो पायेगा' हे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राऊत बोलत होते. 'सुरतच्या हॉटेलचं बिल १२० कोटी रुपये, गुहाहाटी हॉटेलचं बिल ६८ कोटी रुपये, गोव्याच्या हॉटेलचं बिल ५८ कोटी रुपये आहे. हे सगळ सरकार पाडण्यासाठीचा खर्च आहे.' असं संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्यासाठी निवडणूक आयोगाला त्यांनी साडे पाचशे कोटी रुपये दिले असा आरोप संजय राऊत यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्या पक्ष आणि चिन्हाचा सौदा केला असा देखील आरोप त्यांनी केला.

'तुमसे ना हो पायेगा' याचा अर्थ सरकार नामर्द आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अब खुर्ची खाली करो शिवसेना आ रही है असं राऊत म्हणाले. लोकांचे , शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात सरकार नामर्द ठरतंय, या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. सरकार मेलंय , डेडबॉडी आहे, ही डेडबॉडी आता उचलायला पाहिजे.' असं देखील संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला..

लालबागचा राजाची पहिली झलक साम टीव्हीवर, पाहा व्हिडिओ

Hruta Durgule: बाप्पाच्या भक्तीत रंगली अभिनेत्री ऋता दुर्गुळे; 'गणेश वंदना' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

भाजप आमदाराच्या शाळेला शिक्षण विभागाची नोटीस | BJP MLA Narendra Mehta school gets education department notice

एक म्हैस घेण्यासाठी किती कर्ज मिळू शकते? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

SCROLL FOR NEXT