Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Shiv Sena: मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? शिंदेसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena Merger Buzz: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान शिवसेना शिंदेगटाच्या आमदाराने दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले.

Priya More

राज्यात येत्या काही दिवसांत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदेगटाच्या आमदाराने दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबच मोठं विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळळ उडाली.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत एक अतिशय सूचक आणि मोठे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर पुन्हा एकत्र आले तर तीच खऱ्या अर्थाने खरी दिवाळी असेल, असे रघुवंशी यांनी सांगितले. शिवसेनेत दोन गट पडायला नको होते असे देखील विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर आता दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेला आता शिंदेसेनेच्या आमदाराच्या विधानामुळे उधाण आले आहे. चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले की, शिवसेना एकत्र येणार की नाही हे मला माहित नाही,. पण ज्या दिवशी पक्ष दुभंगला तो दुर्दैवी प्रसंग यायला नको होता, असे मला पहिल्या दिवसापासूनच वाटते. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Wallet Colors for Financial Growth: पैशात वाढ होण्यासाठी कोणत्या रंगाचे पाकीट व पर्स वापरावी?

Washing Machine Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही घाणेरडा वास येतोय? 'या' चुका आजच टाळा

Maharashtra News Live Update: दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर तीच खऱ्या अर्थाने दिवाळी; शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सूचक विधान

Lucky Zodiac Signs : लक्ष्मीची पावले घरात येणार! ५ राशींचं नशीब! पुढील ७ दिवस पैशाचा वर्षाव, कामात मिळणार मोठं पद

Nagpur Earthquake: दिवाळीत नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव

SCROLL FOR NEXT