Shiv Sena Shinde group MLA Tanaji Sawant addressing party workers at a victory resolution meet. saam tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant: गद्दारी केली तर ठेचून काढणार; शिंदे सेनेच्या आमदाराचा पदाधिकाऱ्यांना दम

MLA Tanaji Sawant Warning To Rebels : शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरांना कडक इशारा दिला. तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना दम भरला. सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकलंय.

Bharat Jadhav

शिंदे सेनेच्या आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोरांना कडक इशारा

विजयी संकल्प मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य

जिल्हा परिषद आली काय? गेली काय? आम्हाला त्याचं काही नाही परंतु गद्दाराला ठेचल्याशिवाय सोडायचं नाही अशा शब्दात माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करणाऱ्यांना इशारा दिलाय. माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी विजयी संकल्प मेळाव्यात हा दम दिलाय.

महानगरात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले जातंय. आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी वाशी तालुक्यातील नरसिंह साखर कारखान्यावर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी बंडखोरी करणाऱ्यांचा कायमचा इलाज करून टाका असा अजब इशारा पदाधिकाऱ्यांना दिला.

मेळाव्यात बोलताना सावंत यांनी विधानसभेच्या विजयाबद्दल आणि नगरपालिका निवडणुकीतील निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली. एवढ्या कमी मताने विजय झाल्याचं सांगत त्यांनी विरोधकांवरही टीका केली. तानाजी सावंत धाराशिवमध्ये मोठ्या ताकतीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरलेत. विशेष म्हणजे, नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढलेल्या सावंत यांनी झेडपी आणि पंचायत समितीसाठीही तयारी केलीय.

महापालिकेच्या निवडणुकीत झालेली बंडखोरी आणि नगर पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला पाहायला मिळालेत. त्यावरून जिल्हा परिषदेतही बंडखोरी आणि पक्षप्रवेश घडवले जातील असा संकेत देत सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिलीय.

जिल्हा परिषद आली काय? गेली काय? पण गद्दाराला ठेचा

जिल्हा परिषद आली काय? गेली काय? आम्हाला त्याचं काही नाही. पण बाळासाहेबांची शिवसेना काय असते हे त्या गद्दाराला दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना धडा शिकवूच. जिल्हा परिषदेच आम्हाला काही पडलं नाही. सत्तेसाठी आम्ही जन्मलो नाही आणि शिवसेना सत्तेसाठी कधीच जन्मली नाही. ८० टक्के समाज सेवा आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचं बीद वाक्य आहे. त्या ८० टक्क्यांत आम्ही कमी पडलो नाही.

अतिवृष्टीच्या वेळी आम्ही मदत केली. स्वखर्चाने रस्ता तयार केल्याचं सांगत तानाजी सांवत यांनी ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी पक्ष सोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही सुनावलं. ओमराजे निंबाळकर यांनी एखादा रस्ता तयार करण्यासाठी एक पाटी सुद्धा मुरुम टाकला नाही. अशा व्यक्तींकडे तुम्ही का जाता? मग फितुरी कार करता. तुम्ही स्पष्टपणे सांगा तु्म्ही जिल्हा परिषदेत पडू नका, मी ते सोडून देईल. असंही तानाजी सावंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पुण्यात सभा

Rava Cutlet Recipe: आठवड्याच्या पहिल्या दिवशी नाश्त्याला बनवा कुरकुरीत रवा कटलेट, सोपी आहे रेसिपी

Solapur Crime: भेटायला बोलावून तरुणाने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर स्वत:वरही केले वार; हत्याकांडाच्या घटनेने सोलापूर हादरले

Dalimba chutney Recipe : आरोग्यदायी डाळिंबाची आंबट-गोड चटणी, वाचा सोपी रेसिपी

Cold Protection: बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी 'ही' एक चूक करताय, आताच अलर्ट व्हा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT