Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानभवनात शिंदे - ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये शाब्दिक धुमश्चक्री, VIDEO बघाच!

Shinde Vs Thackeray Group : मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आज विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. दरम्यान ठराव मांडण्याआधी आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात विधानभवनात जगलबंदी पहायला मिळाली.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आज विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. दरम्यान ठराव मांडण्याआधी आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात विधानभवनात जगलबंदी पहायला मिळाली. तुम्ही आमच्याकडे कधी येताय या संजय शिरसाट यांनी विचारलेल्या प्रश्नावर वैभव नाईक यांनी अतिशय मिश्किलपणे उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन्ही गटाचे आमदार एकमेकांशी थोडं अंतर ठेवून असतात, मात्र आज विधानभवनात दोन आमदारांची थेट जुगलबंदी रंगल्यामुळे राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

कोण काय म्हणालं?

वैभव नाईक - तुम्ही शपथ कधी घेताय

सिरसाट - तुम्ही आला तर आमच्याकडे विस्तार होईल ना, आता जयंत पाटील येणार आहेत तिकडनं आणि तू येणार आहेस.

वैभव नाईक - मी येणार होतो ते राहुदे आता तुमच्या शपथविधीच काय झालं ते सांगा.

शिरसाट - तु आल्यावर आपण सोबत घेऊ ना

वैभव नाईक - तुम्ही आता फाऊंडर मेंबर त्या शिवसेनेचे आणि या शिवसेनेचे मग आता कधी घेणार

शिरसाट - तु आल्यावर आपण सोबत घेऊ शपथ, नाहीतर तू एकनाथ शिंदेंसारखं कर

वैभव नाईक - आम्ही सांगतो आहे की उठाव वगैरे करणार नाही, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत

शिरसाट - नक्की

वैभव नाईक - हो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच

एकनाथ शिंदेयांच्यासह शिवसेनेत बंड केलेल्या ४० आमदारांमध्ये संजय शिरसाटही होते. मात्र कु़डाळचे आमदार वैभव नाईक ठाकरे यांनी ठाकरेंची साथ सोडलेली नाही. सध्या राष्ट्रवादी पक्षातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधान आलं आहे. जयंत पाटील यांनी यांचं खंडन केलं आहे. तर काही अशोक चव्हाण यांच्यानंत अनेक कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच संजय शिरसाट आणि वैभव नाईक यांच्या रंगलेल्या जुगलबंदीचा विषय चर्चेचा ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT