eknath shinde uddhav thackeray x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये धक्का! ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे सहा माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे.

Yash Shirke

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या सहा माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकांचा उद्या (२९ जून रोजी) दुपारी बाराच्या सुमारास ठाण्यामध्ये पक्ष प्रवेश होणार आहेत. यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व वाढणार आहे.

उद्धव ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये धक्का देण्यात आला आहे. माजी नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला होता. आता माजी नगरसेवकांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाची नाशिकमधील ताकद कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

नागपूरमध्ये ठाकरे गटाला धक्का

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्याआधी ठाकरे गटातून नेते, पदाधिकारी बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरु असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला गळती सुरु असल्याचे म्हटले जात आहे. नाशिकसोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नागपूरमध्येही धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे माजी नागपुर शहर प्रमुख राजू तुमसरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तुमसरे यांच्यासह नागपुरातील ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते देखील शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

Maharashtra Live News Update: नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर हौशी जोडप्याची फजिती

Heartbreaking Story : मुलीचा संसार पत्त्यांसारखा कोसळला, जावयाने पाठवलेली नोटीस वाचून सासऱ्याला हार्ट अटॅक

WhatsApp: तुमच्या गर्लफ्रेंडने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलंय? मग 'या' ट्रिक्सने करा मेसेज

SCROLL FOR NEXT