Raj Thackeray On Sharad pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं', राज ठाकरेंचे वक्तव्य; शरद पवारांचे एका वाक्यात 'रोखठोक' उत्तर!

Maharashtra Politics Sharad Pawar Vs Raj Thackeray: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवरुन महत्वाचे विधान केले. 'या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणले" असे राज ठाकरे म्हणाले होते.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. ३० जून २०२४

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशदरम्यान प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत बोलताना मनसे अध्यक्षांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवरुन महत्वाचे विधान केले होते. राज ठाकरेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील राजकारण आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवरुन महत्वाचे विधान केले. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणले असे राज ठाकरे म्हणाले होते.

शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर!

मनसे अध्यक्षांच्या या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही एका वाक्यात रोखठोक उत्तर दिले आहे. "मला माहित नाही, आमचे पाय जमिनीवरच आहेत," असे शरद पवार म्हणाले. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, या मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारण, पोर्शे अपघात यावरुन परखड भाष्य केले. आज जरी महाराष्ट्र जातीपातीमध्ये अडकला असला तरी यातून निश्चितपणे मार्ग निघेल, मी महाराष्ट्राला यातून बाहेर काढेन, असं ते म्हणाले. मराठी म्हणून एकसंध उभे राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT