Chhagan Bhujbal On NCP Reunion saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीची ताकद वाढणार, लवकरच सगळ्यांचं मनोमिलन; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान

Chhagan Bhujbal On NCP Reunion: शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबत आता चर्चा होऊ लागल्या आहेत. 'शरद पवारांनी आशेचा किरण दाखवला आहे. एकत्र आल्यास आनंदच होईल.', अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी हे मोठं विधान केले आहे.

Priya More

'भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही.', असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. सध्या त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर अनेक राजकीय पक्षाचे नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. शरद पवारांच्या या विधानावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवारांनी एक आशेचा किरण दाखवलाय. लवकरच सगळ्यांचे मनोमिलन व्हावे ही इच्छा', असं विधान भुजबळांनी केले आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'मी मागेही सांगितले होते ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी मी बोललो होतो ही सगळीच कुटुंब एकमेकांपासून दुरावलेली आहेत. ती सगळी कुटुंब जर एकत्र आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल.' दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल असं देखील भुजबळांनी सांगितले.

तसंच, 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आज शरद पवार यांनी जे विधान केले आहे त्यामाध्यमातून त्यांनी एक आशेचा किरण दाखवला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या देखील अनुभवाचा फायदा आम्हा सर्वांना मिळेल. राष्ट्रवादीची शक्ती देखील यामुळे निश्चितच वाढणार आहे. लवकरच सगळ्यांचं मनोमिलन होईल अशी इच्छा आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार निर्णय घेऊ शकतात. कुणाला वाटलं मी पुढाकार घ्यावा तर मी निश्चित पुढाकार घेईन. पण पवारांच्या घरात वाढलेले अजित पवार आहेत त्या सर्वांना मध्यस्थांची काही गरज आहे असं मला वाटत नाही.', असं देखील भुजबळ म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी नुकताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले आहे. 'भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. भविष्यात एकत्र यायचे की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला झालोय. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तर आम्ही विचाराने एकत्र आहोत.', असं विधान शरद पवार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT