Sharad Pawar/Nana Patole Saam TV
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: भिवंडी लोकसभेवरुन पडणार वादाची ठिणगी; कॉंग्रेसकडे असलेल्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा; उमेदवारही ठरला?

Loksabha Election: महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने 11 जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १५ जानेवारी २०२४

Bhiwandi Loksabha Election 2024:

भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केल्याने महाविकास आघाडीसमोर नवा पेच उभा राहिला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्या 11 लोकसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे.

त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. दरम्यान भिवंडी लोकसभा आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसकडे होता त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत वाद?

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष तसेच महायुतीच्या घटक पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. काही जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये तसेच महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांमध्येदेखील रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा आघाडी सरकारच्या काळापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाटायला आला आहे. 2014 व 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा भाजपाचे कपिल पाटील यांनी बाजी मारली आहे.

भिवंडी लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा...

त्यामुळे महायुतीत (Mahayuti) ही जागा साहजिकच भाजपच्याच वाटायला जाणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने 11 जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याला देण्यात यावा अशी मागणी केल्याचे राष्ट्रवादी भिवंडी लोकसभेचे प्रभारी सुरेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष..

त्यामुळे काँग्रेस याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने या मतदारसंघात आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याचे देखील बोलले जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले सुरेश मात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचे देखील बोलले जात आहे.

सुरेश म्हात्रे राष्ट्रवादीचे उमेदवार?

सुरेश म्हात्रे यांनी 2014 साली मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं. त्यानंतर सुरेश मात्रे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती . काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हात्रे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT