Maharashtra Politics Secret Game Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics Sacred Games: कुछ बड़ा होने वाला है! शरद पवारांसह दोन-तीन नेत्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात 'सेक्रेड गेम्स'चा थ्रील

Satish Kengar

Maharashtra Politics Sacred Games: 'कुछ बड़ा होने वाला है..', सेक्रेड गेम्स (Sacred Games) मधील हा डायलॉग आता महाराष्ट्राच्या राजकारणावरही तंतोतंत फिट होताना दिसत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यातील चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल, असं सूचक वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषद घेत हळू हळू चित्र स्पष्ट होईल, असं सांगितलं. यातच आज सकाळी प्रफुल्ल पटेल यांनीही १० दिवसांत पिच्यर क्लिअर होणार, असं म्हटलं आहे. यामुळेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुछ बड़ा होने वाला है', असं म्हणावं लागेल.

कोल्हे आणि लंके परतले

शरद पवार यांनी रविवारी म्हटल्याप्रमाणे काही प्रमाणात आता पुन्हा चित्र बदलताना दिसत आहे. काल शपथविधीवेळी अजित पवार यांच्यासोबत दिसलेले खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ''जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है, पर दिल कभी नहीं.'' असं म्हणत त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासोबत सोबत असल्याचं सांगितलं.

९ जणांविरोधात अपात्रतेची कारवाई

खासदार आमोल कोल्हे यांच्यासोबतच आमदार निलेश लंके हे देखील शरद पवार यांच्याकडे परतले आहे. शरद पवार यांनी स्वतः रविवारी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी फोनवरून संवाद साधल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. यानंतर अनेक आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. यातच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यासह ९ जणांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधातही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार गटही सक्रिय

असं सगळं असलं तरी आता अजित पवार गटही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केल्याचं आणि तटकरे यांची नियुक्ती केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसेच आमच्याकडे ४० आमदार असल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या भूकंपानंतर आणखी कोणकोणते नवे ट्विस्ट येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT