NCP Merger Politics:  saam tv
महाराष्ट्र

NCP Merger : राष्ट्रवादीत विलीनीकरणाऐवजी तिसरा गट पडेल; महायुतीच्या मंत्र्याची शंका, राजकीय वर्तुळात ट्विस्ट

NCP merger latest update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना नवा ट्विस्ट मिळाला आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही गट एकत्र येण्याऐवजी तिसरा गट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली.

Namdeo Kumbhar

Sanjay Shirsat statement on NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट आणि शरद पवार गट) दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या जोरदार चर्चांवर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याऐवजी त्यातून तिसराच गट निर्माण होईल की काय, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

एकमेकांचे कपडे फाडणाऱ्यांचे विलीनीकरण कसे होणार?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरणाच्या चर्चेवर संजय शिरसाट यांनी टोला लगावला. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरुवातच दररोज एकमेकांचे कपडे फाडण्याने होत असेल, तर त्यांचे विलीनीकरण होईल असे अजिबात वाटत नाही. उलट या दोन्ही राष्ट्रवादी मिळून तिसरा गट तयार होतो की काय, अशी शंका वाटत आहे.

तसेच रोहित पवार यांच्या आरोपांचा उल्लेख करत ते म्हणाले की, सध्या दोन्ही राष्ट्रवादीत अंतर्गत कुस्ती सुरू आहे. सकाळी विलीकरणाच्या चर्चा होतात आणि दुपारी एकमेकांवर आरोप केले जातात. त्यामुळे नक्की काय चालले आहे, याचा अंदाज बांधणे आता कठीण झाले आहे.

'गोकुळ' दूध संघाच्या वादावर प्रतिक्रिया

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या वादावरही संजय शिरसाट यांनी विधान केले. ते म्हणाले की, हा कायदेशीर पेच सध्या पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही. जोपर्यंत कायदेशीर पेच सुटत नाही, तोपर्यंत दोन्हीपैकी कोणत्याही गटाचे समाधान होणार नाही.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, कायदेशीर बाबी आणि दोन्ही बाजू सध्या न्यायालयासमोर मांडल्या गेल्या आहेत. त्यांच्या सरकारच्या काळातही त्यांनी असे काही निर्णय घेतले होते.

'राऊत-सरनाईक' भेटीचे समर्थन

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या भेटीवर शिरसाट यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, सणासुदीच्या काळात सर्वांमध्ये गोडवा कायम असला पाहिजे. वैयक्तिक किंवा राजकीय भांडणे सार्वजनिक जीवनात आणणे योग्य नाही. प्रताप सरनाईक त्यांना भेटले यात काही गैर नाही, मी स्वतःसुद्धा अनेक राजकीय विरोधकांना भेटत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea And Biscuits Side Effects: रोज सकाळी नाश्त्याला चहासोबत बिस्किटे खाता? आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Maharashtra News Live Update: गोकुळ अध्यक्षपद निवडणूकीसाठी महायुतीकडून शक्तीप्रदर्शन

NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा

Kidney Damage Risk: निरोगी किडनीला आतून पोखरतायत या 4 सवयी; तुम्हालाही असतील तर आजच बदलून टाका

HUL Price Hike: कपडे धुणं आता महागणार! Surf Excel, Rin आणि Wheel महागले; साबणाच्या किमतीतही वाढ, पाहा नवे दर

SCROLL FOR NEXT