Sanjay Raut|Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'आम्ही सिनेमे काढले तर तोंड झाकून फिरावे लागेल', संजय राऊतांचा CM शिंदेंवर घणाघात; 'धर्मवीर'वरुन जोरदार जुंपली!

Maharashtra Politics Latest News: " या राज्यात उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच सरकार येणार असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या पुण्यातील अधिवेशनावरुन जोरदार टीका केली.

Gangappa Pujari

मयूर राणे, मुंबई|ता. २१ जुलै २०२४

"गुरु पौर्णिमेचे महत्व आम्हाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजले. ज्ञान, स्वाभिमान, निष्ठा, ईमान याबाबत योग्यवेळी मार्गदर्शन केले आणि नुसते मार्गदर्शन नाही तर माणसांची घडवणूक अन् जपणूकही शिवसेनाप्रमुखांनी केली," असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरू पोर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरेंना वंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"बाळासाहेब ठाकरेंमुळेच आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे ते गुरु होते. पण त्यातून काही नासके आंबे निघाले. माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी बाळासाहेब गुरु म्हणून त्यांनी फोटो लावू नये," असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

"आम्ही आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. आज आनंद दिघे साहेबांना त्यांचा मारुती सांगणारे फिरत आहेत. सिनेमे, नाटके काढत आहेत पण त्यांच्या काय भावना आहेत आम्हाला माहिती आहे, आम्ही जर सिनेमे काढले तर त्यांना तोंड झाकून फिरावे लागेल," असा टोलाही राऊतांनी लगावला.

"गृहमंत्र्यांनी ठाण मांडू द्या. ट्रम्पला बोलवा किंवा पुतीनला बोलवा या राज्यात उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या तिघांच्या महाविकास आघडीचे सरकार येईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या अधिवेशनावरुन टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT