Maharashtra Politics Sanjay Raut Press Conference Criticizes PM Narendra Modi BJP Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: गडकरींचे तिकीट कापणार; PM मोदी नागपूर किंवा पुण्यातून लढणार... संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Politics: लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ हा २०२७ पर्यंत होता.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. १० मार्च २०२४

Sanjay Raut Press Conference:

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ हा २०२७ पर्यंत होता. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजीनामा दिल्याने शासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

कारणाशिवाय आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही. सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. तेव्हा ही कोणते भूमिका घेतली नाही. आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काय तरी ठरवून घोळ घालण्याचा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या जागी काम करतील. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आदेशानुसारच निवडणूक आयोगात काम करतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली

तसेच "कोणाचा डंपर पलटी होतो आणि कोणाचा डंपर वर जातो हे समजेल. ज्या डंपरमध्ये हे बसले आहेत तो कचऱ्याचा डंपर आहे. हा सगळा कचरा डंपरह महाराष्ट्राच्या सीमेच्या पुढे गुजरातमध्ये जाऊन टाकणार आहोत, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

मोदी महाराष्ट्रातून लढणार?

"महाराष्ट्रातून भाजपने मोदींना (PM Narendra Modi) जाऊन विनंती केली तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढा आणि मोदीजी स्वीकारत आहेत. मोदींच्या डोक्यात असं आहे की गडकरींचे तिकीट कापून नागपुरातून किंवा पुण्यातून लढावे.." असा मोठा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT