Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut Video: 'मोदी- शहांचा आवाज चालणार नाही, २४० चे २७५ कधी होतील कळणारही नाही', संजय राऊत गरजले!

Sanjay Raut Press Conference Nashik: आजपासून १८ व्या लोकसभेच्या संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी- शहांवर निशाणा साधला. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २४ जून २०२४

आज १८ व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला जनतेने बहुमत दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाले. आज सर्व नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. या अधिवेशनावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिले ३ दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होईल. इंडिया आघाडीचे खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जमतील. हातात संविधानाची प्रत घेत संविधानाच्या प्रति कटिबद्ध आहोत हे संदेश देतील, मोदी शहांच्या ईस्ट इंडिया कंपनीला आता विरोधी पक्ष कळेल," असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

तसेच "विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल. 240 चे 275 होतील हे कळणारसुद्धा नाही, त्यांच्या सारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही. या देशात कायदा असेल तर वायकर यांना शपथ दिली जाणार नाही. आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी-शहा यांचा आवाज चालणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तसेच "हे सरकार भ्रष्टचारातून निर्माण झाले आहे. राज्यात घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. लोकसभेला त्यांना फटका बसला. विधानसभेला तर त्याहून मोठा फटका बसेल, अशी टीका करत कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, कर्जमाफी करावी," अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT