Sanjay Raut Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'महानंद डेअरी गुजरातला पळवण्याचा डाव, ठाकरे गट गप्प बसणार नाही..' संजय राऊतांचा सरकारला इशारा

Maharashtra Politics: महानंद डेअरीच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे.. असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. ३ जानेवारी २०२४

Sanjay Raut News:

महानंद (Mahanand) राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे (NDDB-National Dairy Development Board) देण्यासाठीची हालचाल राज्य सरकारकडून सुरू आहे. यावरुन राज्य सरकरविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महानंदा डेअरीच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे.. असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव उघड झाला आहे. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली. महानंदा त्या संदर्भात जे वास्तव मी पाहतो आहे. महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू आहे.. अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

हे कसले राज्यकर्ते..?

तसेच "महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख पुसून टाकली जात आहे. यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का? रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरातमध्ये नेलं जात आहे आणि हे तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

तर ठाकरे गट गप्प बसणार नाही..

"दुग्ध व्यवसायाची सहकारी चळवळ प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊन जात आहात. एक जात सगळे तुम्ही दिल्लीच्या ताटाखालचे मांजर बनून सहन करत आहात. महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचे सरकार तयार झालेलं आहे. जर महानंदा डेअरी गुजरातला नेण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही.. अशा इशाराही संजय राऊत यांनी दिला. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT