Sanjay Raut Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'नैतिकतेचे बुडबुडे, ढोंग अन् सोंग...' नवाब मलिकांवरुन राजकारण तापलं; संजय राऊत भाजपवर बरसले

Sanjay Raut Latest News: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांनी सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

Sanjay Raut News:

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांनी सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेणे योग्य नसल्याची भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

काय म्हणाले संजय राऊत?

"लबाड लांडगे ढोंग करतात असे म्हणतात. एखाद्या कपटी कोल्ह्याने वाघाचे कातडे पांघरुन नैतिकतेच्या डरकाळ्या फोडाव्या तसा हा प्रकार आहे. सत्तेपेक्षा देश महत्वाचा, सत्ता येते आणि जाते ही नवीनच माहिती भाजपने (BJP) दिल्याचा," टोला संजय राऊतांनी लगावला. तसेच ज्या प्रमाणे नवाब मलिकांवर आरोप आहेत, तेच आरोप प्रफुल्ल पटेलांवर आहेत. त्यांच्याबद्दल भाजपची काय भूमिका आहे.. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रफुल्ल पटेल, अजित पवारांबाबत भूमिका काय?

"हसन मुश्रीफ, ७० हजारांचा सिंचन घोटाळावाले अजित पवार (Ajit Pawar) तसेच प्रताप सरनाईक, भावना गवळी अशी कितीतरी नावे आहेत. नैतिकतेचाच मुद्दा असेल तर ज्यांच्यासोबत तुम्ही सत्ता स्थापन सत्ता केलीय, ते सर्व भ्रष्टाचारी आहेत. म्हणूनच नैतिकता हे ढोंग आहे.." असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सावरकरांना भाजपने भारतरत्न द्यावा..

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा वाद उभा राहिला आहे. भाजपने याविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. यावर बोलताना 'त्यांचे काही चालत नाही. वीर सावरकर यांना देशाच्या जनतेने उपाधी लावली आहे. असे राऊत म्हणाले. तसेच भाजपने वीर सावरकर यांना भारत रत्न द्यावा..' अशी मागणी ही त्यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT