Sanjay Raut Criticized Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: त्यांना डॉक्टरची गरज की मांत्रिकाची?, शिंदेंच्या आजारपणावर राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut Criticized Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या आजारपणावर त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

Priya More

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत. सध्या ते साताऱ्यातील त्यांच्या दरे गावामध्ये आहेत. यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. 'एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची', अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काही आता वेड्यावाकडे बोलू नका. त्यांची प्रकृती नाजूक आहे तुम्ही बघितला ना हाताला पट्टी लावून बसले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले पण त्यांच्या मंत्र्यांना देखील भेटायला दिलं नाही.'

तसंच, 'अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला असं डिस्टर्ब करू नका पाच तारीखला ते येत आहेत का शपथविधीला? का एअर ॲम्बुलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेत अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असे मी वृत्तपत्रात वाचलं. पण त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकांची गरज आहे. त्यांना बरं करण्यासाठी हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत.

'एकनाथ शिंदेंच्या अंगात भूत संचराला आहे तो उतरायला पाहिजे. ते काम जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे.', अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसून ते सध्या दरे गावामध्ये आहेत. त्यांना ताप, सर्दी आणि खोकला झाला आहे. ते आज मुंबईत येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT