Sanjay Kshirsagar
Sanjay Kshirsagar 
महाराष्ट्र

Sanjay Kshirsagar: भाजपला सोडल्यानंतर संजय क्षीरसागर यांना अश्रू अनावर; प्रतिक्रिया देताना सांगितलं बरचं काही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत नागणे, पंढरपूर

Sanjay Kshirsagar Join Sharad Pawar Group : पंढरपूर : भाजपला सोलापूरनंतर आता पंढरपूरमध्येही धक्का बसलाय. भाजपमधील २५ वर्षांपासून प्रवास थांबवल्यानंतर संजय क्षीरसागर यांना अश्रू अनावर झालेत. भाजमधील आपला राजकीय प्रवास का थांबवला याचे कारण सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

माढातील नेते विजयमोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आता पंढरपूर मोहोळमधील भाजप नेते संजय क्षीरसागर यांनीही शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश गटात प्रवेश केलाय. दरम्यान भाजप सोडताना क्षीरसागर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी आपल्याला एक महिना वेळ दिला नाही. हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. शरद पवारांनी मला मोहोळ मतदारसंघासाठी आशीर्वाद दिलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे लढणार आणि जिंकणारसुध्दा, असा विश्वास ही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव न घेता सोलापूर जिल्ह्यातील एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने माझे खच्चीकरण केल्याचा आरोप क्षीरसागर यांनी यावेळी केला. संजय क्षीरसागर आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड ताकद असताना आपण भाजपची बांधणी केली. पण आता याच भाजपने बेदखल केलं. आमच्या प्रामाणिकपणे केलेल्या कामावर हा अन्याय असल्याचं संजय क्षीरसागर म्हणाले.

मोहोळ येथे क्षीरसागर यांचा पक्ष प्रवेश खुद्द शरद पवार यांच्या साक्षीने झाला. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवलीय. क्षीरसागर यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का मानला जातोय. क्षीरसागर यांच्या पक्ष प्रवेशाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोण आहेत संजय क्षीरसागर

२०१४ ला संजय क्षीरसागर यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. मोहोळ तालुका १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे भाऊ संजय क्षीरसागर यांनी कधी शिवेसना तर कधी भाजपकडून राष्ट्रवादीला आव्हान दिलं होतं. संजय क्षीरसागर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर लढले. तेव्हा ८ हजार मतांच्या फरकाने ते पराभूत झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT