Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आदिवासींवर पोलिसांचा लाठीचार्ज? रोहित पवारांचे आरोप! शिंदेंचं नाव घेत आमदाराचं स्पष्टीकरण

Maharashtra Political News : रोहित पवारांनी व्हिडीओ ट्वीट करत पोलिसांनी आदिवासींवर लाठीचार्ज केल्याचे आरोप केले होते. या आरोपवर अजित पवार यांच्या आमदाराने स्पष्टीकरण दिले आहे.

Yash Shirke

  1. अकोले रॅलीत आदिवासींवर पोलिस लाठीचार्जचा रोहित पवारांचा आरोप.

  2. आमदार किरण लहामटे यांनी लाठीचार्ज नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

  3. घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असताना घडली.

  4. आदिवासी दिनानिमित्त अकोलेत रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित.

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे काल (९ ऑगस्ट) आदिवासी दिनाच्या निमित्ताने भव्य रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान आदिवासी बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले. यासंबंधित व्हिडीओ त्यांनी ट्वीट केले. लाठीचार्ज झाला नसल्याचे स्पष्टीकरण उपस्थित राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी दिले आहे.

'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जाणार असल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. तो लाठीचार्ज नव्हता, फक्त झटापट झाली. या झटापट्टीचाही मी निषेध व्यक्त करतो. मला जर त्यांनी सांगितलं असतं, तर मीच रस्ता मोकळा करुन दिला असता', असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या अकोले तालुक्यात दरवर्षी विविध पक्ष, संघटनांकडून आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या आदिवासी दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रॅली आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . दुसऱ्या बाजूला, आमदार किरण लहामटे यांनीदेखील स्वतंत्र रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

अकोले येथे एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपल्यावर एकनाथ शिंदे यांचा परतीच्या मार्गासाठी पोलिसांनी रस्ता मोकळा करायला सुरुवात केली. याचदरम्यान आदिवासी आणि पोलीस यांच्यात झटपट झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तेथे लाठीचार्ज झाला नसून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला अशी माहिती किरण लहामटे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT