Speculation rises over a major split in Shinde Sena as Sanjay Raut claims Uday Samant may join BJP saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? शिंदेसेनेत उभी फूट पडणार? राऊतांचा खळबळजनक दावा

Uday Samant Join BJP: उदय सामंत शिंदेसेनेतील मोठा गट घेऊन भाजपात जातील आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, अशी चर्चा रंगलीय. मात्र उदय सामंत भाजपसोबत जाण्याचे संकेत कुणी दिलेत. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • शिंदेसेनेत फूट पडण्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली.

  • उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.

  • महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चर्चा रंगलीय आणि या भुकंपाचे हादरे थेट शिंदेसेनेला बसणार आहेत. उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय.

खरं तर राऊतांनी सामंतांबद्दल गौप्यस्फोट करण्यामागचं कारण आहे सामंतांनी अंबादास दानवेंबद्दल केलेलं वक्तव्य. दानवे ठाकरेसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याचं सामंतांनी म्हटलं आणि त्यावरुनच राजकारण पेटलं. सामंतांच्या वक्तव्यावर दानवेंनी स्पष्टीकरण दिलं खरं. मात्र त्यानंतर हाच प्रश्न संजय राऊतांना विचारल्यानंतर राऊतांनी सामंतच शिंदेसेनेतील मोठा गट घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलंय.

एवढंच नाही तर शिंदेसेना फोडाफोडीची स्क्रिप्ट दावोस दौऱ्यात लिहीली गेल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय. याच राऊतांच्या दाव्याची री दानवेंनी ओढलीय.शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नसती तर सामंतांनाच उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार होतं. असंही दानवेंनी म्हटलंय.

याआधी विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंतांच्या नेतृत्वात शिंदेसेना फुटण्याचा दावा केला होता. त्यावेळी सामंतांनी हा दावा फेटाळून लावला होता. आता कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेत शिंदेंनी भाजपला वगळून सत्तेचं गणित जुळवलंय. त्यामुळे शिंदेंवर नाराज असलेल्या भाजपच्या नेतृत्वानं दावोसमध्ये सामंतांना आपल्याकडे वळवलं असेल तर शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागण्याआधीच शिंदेसेना फुटून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT