Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी.... CM शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Maharashtra Politics: परळीत होणाऱ्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहण्यावरून शंका उपस्थित केली जात होती. मात्र पंकजा मुंडे यांनी या सभेला हजर राहात विकासासाठी कोणत्याही मंचावर आपली जाण्याची तयारी आहे, अशी भूमिका मांडली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

परळीत होणाऱ्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहण्यावरून शंका उपस्थित केली जात होती. मात्र पंकजा मुंडे यांनी या सभेला हजर राहात विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची आपली तयारी आहे, अशी भूमिका मांडली आहे. परळीची कन्या म्हणून मी या व्यासपीठावर आली आहे. विकासासाठी कोणताही द्वेष बाळगणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले आहेत. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पालकमंत्री असताना कधीच जात पात पाहिली नाही. पक्ष देखील पाहिला नाही. मनात कोणताच द्वेष ठेवला नाही. त्यामुळे परळी करांच कर्ज माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर आहे. परळीच्या जनतेने अनेक वर्षे आमच्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळे त्यांच आम्ही काहीतरी देणं लागतो. या जनतेच्या विकासासाठी आपली कोणत्याही मंचावर जाण्याची आपली तयारी आहे.

जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम करताना वैद्यनाथांच्या तीर्थ क्षेत्राचा विकास करायचा होता. मात्र धनंजय मुंडे यांच्या नेतृ्त्वात त्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याबद्दल धनंजय मुंडे यांच अभिनंदन. अत्यंत चांगल काम व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्यावर पंकजा काही बोलतील का याकडे लक्ष लागलं होतं. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आल्याने परळीचा पारा वाढला आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2027: पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार, तारिख आत्ताच लिहून घ्या

7 Best Vegetables for Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात ‘या’ 7 भाज्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Vanita Kharat: वनिता खरातचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केलं कमी

Rain : पुढील २४ तास अत्यंत मुसळधार! ८ राज्यांमध्ये अति-मुसळधार पावसाचा हायअलर्ट; महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?

Panvel Fort : चार राजवटींच्या सत्तांतराचा साक्षीदार आहे नवी मुंबईतील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT