Raj-Uddhav Thackeray Yuti 
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Yuti: राज- उद्धव ठाकरेंच्या युतीला ब्रेक? मनसे नेत्याच्या विधानानंतर चर्चेला उधाण

Maharashtra Politics: ठाकरे गटाला युतीबाबत अचनाक इतका उत्साह का आला? आधी युतीबाबत ठाकरे गट सकारात्मक का नव्हते ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहेत.

Bharat Jadhav

मनसे-शिवसेना ठाकरे गट युती हा आमचा एकमेव विषय नाही. राज ठाकरे हे योग्यवेळी युतीबाबत निर्णय घेतील. पण अचानक युतीसाठी इतका उत्साह का? उद्धव ठाकरेंचे ६० आमदार निवडणून आले असते तर आमचा विचार केला असता का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर पूर्णविराम घालण्याचा प्रयत्न केला. संदीप देशपांडे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी देशपांडे यांनी ठाकरे गटाला प्रश्न करत इशारा दिलाय.

गेल्या काही दिवसांपासून राज-उद्धव ठाकरेंची युती होणार असल्याची सुरू झालीय. ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकरणात मोठी उलथापालथ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ठाकरे गट शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्या बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले. यामुळे राज-उद्धव युती होण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या.

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने राज्यात नवी राजकीय वारे वाहतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या एका विधानामुळे मात्र युतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अचानकच ठाकरे गटाला युतीचा पुळका का आला? युतीबाबत इतका उत्साह आता का? असे प्रश्न संदीप देशपांडे यांनी केल्यानं युतीच्या शक्यतेवर वादाचे ढग दाटलेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याबाबत अध्यादेश लागू करण्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT