Maharashtra Politics X
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'युती के शादी में ठाणे का अब्दुल्ला!' ठाकरे बंधूंच्या युतीवर शिंदेंची टीका, राऊतांनी डागली शिंदेंवर तोफ

Maharashtra Political News : ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. ठाण्याचा 'अब्दुल्ला' म्हणत राऊतांनी तोफ डागलीय... पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिलेत... मात्र याच युतीच्या चर्चांवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय... तर संजय राऊतांनी ठाण्याच्या अब्दुल्लाची उपमा देत एकनाथ शिंदेंवर पलटवार केलाय...

राज ठाकरेंसोबतच्या युतीला उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदिल दाखवलाय...तर माजी नगरसेवक आणि आमदार खासदारही राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर आलीय... मात्र दुसरीकडे मराठी मतांचं विभाजन झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्यानेच शिंदे गटही अस्वस्थ असल्याची चर्चा आहे... त्यामुळेच राज ठाकरेंना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत...

- ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

- ठाकरे ब्रँड सोबत ठेवण्यासाठी शिंदेंचा प्रयत्न

- सामंतांच्या माध्यमातून राज यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरु

- शिंदे स्नेहभोजनाच्या माध्यमातून डाव टाकण्याच्या तयारीत

तर दुसरीकडे विधानसभेतील पराभवानंतर आता देशाचं आर्थिक केंद्र असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गट जोरदार प्रयत्न करतोय..मात्र ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालून राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवणं एकनाथ शिंदेंना शक्य होणार की ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार? यावर महापालिकेच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: सीमेवर वसलेलं 'हे' आहे भारतातील अंतिम रेल्वे स्थानक

Early symptoms of pancreatic cancer : स्वादुपिंडाचा कॅन्सर होत असताना शरीरात होतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

घरातील 'हा' कोपरा ठेवा रिकामा, होईल अनेक लाभ

Sanjay Shirsat: पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला...; मंत्री शिरसाटांचं नवं विधान; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update :परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT