Pankaja Munde And Pritam Munde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पंकजा मुंडेंना दिल्लीचं तिकीट, प्रीतम मुंडेंच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू; आमदारकीसाठी मतदारसंघ ठरला?

Pritam Munde News: पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. प्रीतम मुंडे यांनी शेवगाव- पाथर्डी मतदार संघातून आमदारकी लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

विनोद जिरे

Beed Politics News:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभेच्या प्रचारांचा धडाका सुरू असतानाच विधानसभेचीही मोर्चबांधणी सुरू आहे. अशातच बीडमधून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. प्रीतम मुंडे यांनी शेवगाव- पाथर्डी मतदार संघातून आमदारकी लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

प्रीतम मुंडेंच्या पुनर्वसनाच्या हालचाली?

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन कुठे करणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे निवडून आले असल्यामुळे ती जागा धनंजय मुंडे सोडणार नाहीत. पंकजा मुंडे दिल्लीत धनंजय मुंडे परळीत तर प्रीतम मुंडे यांचे काय होणार? असा प्रश्न असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा (Shevgaon- Pathardi Vidhan Sabha) मतदार संघातून प्रीतम मुंडे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी आता पाथर्डी मधून जोर धरू लागली आहे.

पाथर्डीमधून आमदारकी लढणार?

पंकजा मुंडे नेहमीच म्हणत असतात परळी माझी आई आहे तर पाथर्डी माझी मावशी आहे. त्यामुळे पाथर्डी मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे या मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता भाजपच्या प्रदेश सचिव असलेले अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केली आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंकजा मुंडेंचे सूचक विधान!

दरम्यान, पंकजा मुंडे यांनाही प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पाथर्डी मतदारसंघ निवडणार का? असा प्रश्न केल्यावर त्यांनी याबाबत सूचक उत्तर दिले आहे. पाथर्डीचे आमदार माझ्या शेजारी आहेत, त्यांचे उगाच टेन्शन वाढवू नका, आम्ही कोणत्याही प्रकारे ग्रस्त नाहीत आम्ही संघर्ष करणारे आहोत असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

SCROLL FOR NEXT