Prakash Ambedkar News Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अखेर ठरलं! प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितलाही 'इंडिया आघाडी'त स्थान मिळणार?

Vanchit Bahujan Aaghadi News: केंद्र सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली असून इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष एकत्र आले आहेत.

Gangappa Pujari

Maharashtra Politics:

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्र सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली असून इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष एकत्र आले आहेत. यामध्ये लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही स्थान मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इंडियामध्ये (India Allience) सहभागी होण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली होती. मात्र राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसकडून वंचितच्या सहभागाला विरोध असल्याचे सांगण्यात येत होते.

परंतु आता लवकरच वंचितलाही इंडिया आघाडीमध्ये सहभागी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांचा समावेश केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी सामटीव्हीला दिली.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या बैठकीत वंचित आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, आम्हाला इंडियात सामील करुन घेण्याबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्याची माहिती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी साम टिव्हीला दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT