Mahavikas Aaghadi MVA Opposition Leader Formula Quint
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेत्याला दीड वर्षांची शिफ्ट? मविआचा विरोधी पक्षनेतेपदाचा फॉर्म्युला ठरला?

MVA Opposition Leader Formula: महायुती सरकार स्थापन होऊन दीड महिना उलटलाय. तरीही विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामीच आहे. मोठ्या रस्सीखेचानंतर मविआत विरोधीपक्ष नेत्याचा फॉर्म्युला ठरलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरु होती. मात्र या वादावर पडदा पडल्याची माहिती पुढे आलीय. मात्र महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदाचा फॉर्म्युला काय आहे? आणि विरोधी पक्षनेतेपदाचे नियम काय आहेत? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. महायुतीची सत्ता स्थापन होऊन दीड महिना उलटला. मात्र अजूनही विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामीच आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीत सुरु असलेली रस्सीखेच अखेर संपली असून दीड-दीड वर्षांचं विरोधी पक्षनेतेपद हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे विधानसभेला दीड-दीड वर्षांचा विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे.विरोधी पक्षनेतेपदासाठी काय नियम आहेत? पाहूयात.

विरोधी पक्षनेतेपदाचा नियम काय?

एका पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणे आवश्यक

288 आमदारांच्या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदासाठी 29 सदस्यांची आवश्यकता

महाविकास आघाडीत एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदाला आवश्यक संख्याबळ नाही

1985 ते 1987 दरम्यान अपुरं संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेत्याची निवड

विरोधी पक्षनेतेपदाच्या नियमानुसार महाविकास आघाडी संख्याबळाची पुर्तता करते का? पाहूयात.

कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ

ठाकरे गट- 20

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (SP) - 10

महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं 29 जागांचं संख्याबळ नाही..मात्र महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा आणि परंपरांनुसार विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी महाविकास आघाडीने केलीय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू आधीच अध्यक्षांच्या कोर्टात टोलवलाय. तर अध्यक्षांनीही नियमावर बोट ठेवलंय. मविआतल्या कोणत्याही पक्षाकडं स्वतंत्रपणे संख्याबळ नसलं तरी विधानसभा अध्यक्ष मविआ म्हणून विचार करून विरोधी पक्षनेतेपद देणार की विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेचं कामकाज चालणार याबाबत उत्सुकता आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

SCROLL FOR NEXT