Operation Tiger Returns? Shinde Camp In Touch With 7 Thackeray Mps, Ministerial Offer Buzz Saam tv
महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिलेदाराला केंद्रात मंत्रिपदाची ऑफर; 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा

Operation Tiger Back: ठाकरे गटाचे सात खासदार एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क असल्याच्या चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

  • ठाकरे गटातील सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा.

  • एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा.

  • विनायक राऊत यांनी शिंदे गटावर खासदार फोडण्याचा आरोप केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सात खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातील एका खासदाराला मंत्रिपदाची ऑफर, तर इतरांना मानाची पदं देण्याची ऑफर शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंकडून खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी दांडी मारली होती. त्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाली. याबाबत वाकचौरैंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत बोलणं टाळलं.

सूत्राच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. ते एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. याचमुळे केंद्रातील एनडीएचं संख्याबळ वाढणार आहे. या घडामोडींमुळं चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून केंद्रातील आपली ताकद वाढवण्याची तयारी करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षांचे नऊ खासदार विजयी झाले होते.

दक्षिण मंबई- अरविंद सावंत,

दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई,

धाराशिव- ओमराजे निंबाळकर,

यवतमाळ वाशिम- संजय देशमुख,

हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर,

परभणी -संजय जाधव,

नाशिक- राजाभाऊ वाझे,

शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे,

उत्तर पूर्व मुंबई- संजय दिना पाटील हे विजयी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता नोकऱ्या कमी होणार? TCSमध्ये AIचा वापर वाढवला

Maharashtra News Live Update: कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटात राडा

नाफेडकडून शेतकऱ्यांची थट्टा;आता म्हणे 1800 चा दर देणार

Fact Check: मोदींचा नारा, सोनं विका बँकेत पैसे ठेवा? पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन?

वाढदिवसाचा केक खाणं महागात पडलं, केकचा घास, 3 वर्षाच्या मुलाचा जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT