Shivsena Advertisements Dispute SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पेपरमध्ये जाहिराती कुणी दिली माहिती नाही! शिवसेनाचा काही संबंध नाही - शंभुराज देसाई

Maharashtra Politics: पेपरमध्ये जाहिराती कुणी दिली माहिती नाही! शिवसेनाचा काही संबंध नाही - शंभुराज देसाई

साम टिव्ही ब्युरो

Shambhuraj Desai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची जाहिरात सर्व वृत्तपत्रात छापून आली आहे. या जाहिरातीवरून आता राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा सर्वे कुणी केला असा सवाल उपस्थित केला होता. तसेच शिंदेंची लोकप्रियता फडणवीसांपेक्षा जास्त असल्याचे जाहिरातीत दाखवल्याचे भाजपला मान्य आहे असा टोला देखील लगावला होता.

त्यानंतर आता शिवसेनेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हा सर्वे कोणी केला आणि जाहिरात कोणी दिली हे माहिती नसल्याचं आश्चर्यकारक स्पष्टीकरण दिलं आहे.

सर्व्हे कुणी केला माहित नाही?

या जाहिरातीविषयी स्पष्टीकरण देताना शंभुराज देसाई म्हणाले, आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी संबध नाही. सर्वे कुणी केला आणि जाहिरात कुणी दिली हे माहिती नाही. एखाद्या हितचिंतकाने दिली असावी, असे आश्चर्यकारक स्पष्टीकरण शंभुराज देसाई यांनी दिलं आहे.

जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे...?

या जाहिरातीमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदींना, महाराष्ट्रात शिंदेंना जनतेचं अफाट प्रेम मिळत आहे' असे म्हटले आहे. तसेच राज्यातील जनतेची मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती असल्याचे देखील म्हटले आहे. पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी जनतेचा कोल कोणाला आहे हे दाखवताना एकनाथ शिंदेंना 26.1 टक्के लोकांनी पसंदी दर्शवली तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यापेक्षा कमी 23.2 टक्के लोकांनी पसंदी दर्शवल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकप्रियतेविषयी काय म्हणाले देसाई...?

याविषयी स्पष्टीकरण देताना शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही मित्रपक्ष आहोत पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर ३० वर्षापूर्वी केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. ज्यांनी ही जाहिरात दिली ते हितचिंतक अज्ञात आहे. परंतु ही चांगली गोष्ट आहे की, मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर युतीचेच दोन्ही नेते आहेत. (Shivsena Advertisements Dispute)

जाहिरातीबाबत खुलासा ऐकायला आवडेल - अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले 'देशात मोदी अन् राज्यात शिंदे, हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? तसेच एकनाथ शिंदेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमी असल्याचे भापला मान्य आहे का? असा सवाल करत याबाबत नेहमी खुलासा करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहिरातीबाबत खुलासा ऐकायला आवडेल' असे म्हटले आहटे. (Maharashtra Politics)

चंद्रशेखर बावनकुळेंना उद्देशून अजित पवार म्हणाले, 'तुम्ही म्हणाल अजित पवारांनी नाक खुपसायचं कारण काय? बरं बाबा मी या प्रकरणात नाक खुपसत नाही. परंतु राज्यातल्या मुख्यमंत्र्यांबाबतची जाहिरात आहे. त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष सहभागी आहे. त्यामुळे याबाबत खुलासा करावा', असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

Ashok Kharat: भोंदू बाबाला मदत करणारे कोण? खरात प्रकरणात SITचा तपास कुठंपर्यंत आला? IPS सातपुतेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSMT जवळ ट्रेनला भीषण आग, कारशेडमधील घटनेनं खळबळ

lathi charge on farmers : शेतकऱ्यांवर लाठीमार, जळगावमध्ये संताप, Video

SCROLL FOR NEXT